जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या 27 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. मुलुंड (मुंबई) येथील रंगोत्सव सेलिब्रेशन मध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा या विविध स्पर्धा प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी पदकांची अक्षरशः लयलूट केली.
त्यामध्ये फैजल मोहसीन कादरी, अनुश्री भगवान साळुंखे, श्रावणी विलास चव्हाण, रजीन रियाज कादरी, सोहम निलेश मेहेत्रे, आरव अशोक राजगुरू, पलक श्रीकृष्ण कुऱ्हाडे , विजया शिवदास काहाते, आर्या प्रशांत गनगे , अक्षरा अरुण साळुंके, सोहम रमेश गवळी, चैतन्य राजेंद्र कुऱ्हाडे, आरती बाबासाहेब कर्डिले, श्रेया भरत पंडित या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले.
राजपूत रणदीप मनदीप , विराज भरत कुराडे , आरवी अजिंक्य विधाटे, किमया कैलास तांबे, सुप्रिया विठ्ठल साळुंके, क्रिया संजय साळवे रौप्य पदक मिळविले. तर 4 विद्यार्थ्यांनी कास्यपदक मिळविले. त्यामध्ये गाडेकर कावेरी मिलन, पवार अथर्व राहुल, शिवतेज संदीप निकम, सर्वेश सुशील सोनवणे , अशा एकूण 27 विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली. एकाच शाळेचे एकाच वेळी , एकाच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अनेक विद्यार्थी सुवर्णपदकांची मानकरी ठरणारी ही तालुक्यातील एकमेव शाळा असल्याची माहिती प्राचार्य रविंद्र गावडे यांनी दिली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर व प्राचार्य रवींद्र गावडे सर यांनी अभिनंदन केले.
