नेवासाफाटा (प्रतिनिधी)- नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार मोहन गायकवाड यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे. प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत पत्रकारांसाठी विविध उपक्रम विषयी चर्चा, विविध विषयांवरील पत्रकार परिषदांचे आयोजन आणि पत्रकार परिषदांसाठीचे नियोजन, शहरातील पत्रकारांचे प्रलंबीत प्रश्न, पत्रकारांच्या संरक्षण कायद्याचा पाठपुरावा, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्रकार वसाहतीचा प्रश्न याबाबत चर्चा करण्यात आली. पत्रकार कैलास शिंदे यांनी प्रास्ताविक करून संघाच्या कामकाजाची माहिती सांगितली.यावेळी नूतन निवड करण्यात आलेली प्रेस क्लब कार्यकारणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्षपदी कैलास शिंदे व नाना पवार, कार्याध्यक्षपदी सुधीर चव्हाण,सरचिटणीसपदी अशोक डहाळे,सहसचिवपदी सुहास पठाडे, खजिनदारपदी रमेश शिंदे, सह खजिनदारपदी
शाम मापारी, संघटकपदी मकरंद देशपांडे, शंकर नाबदे सह संघटकपदी यांची निवड करण्यात आली. तर पवन गरुड,अभिषेक गाडेकर यांना
मीडिया प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी मागील कालावधीतील उपक्रमातील माहिती दिली. तसेच यावेळी त्यांचा मागील वर्षातील चांगल्या कामकाजाबद्दल प्रेस क्लबच्या वतीने अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली.
