बालाजी देडगाव येथे दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या शनिवार दिनांक १४ रोजी दत्त मंदिर देवस्थान येथे हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली भगवान दत्ताचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे हे ५७ वे वर्ष आहे.
यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यादरम्यान दत्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी ५ ते ६ दरम्यान हभप गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. तदनंतर लगेचच भगवान दत्ताचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानंतर आलेल्या भाविकांना माजी चेअरमन अरुण शंकर बनसोडे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जन्म सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बालाजी देडगाव, दत्त मंदिर ट्रस्ट उत्सव समिती व कैलासनाथ मित्र मंडळ यांनी केले असून बजरंग दल, श्री बालाजी देडगाव ट्रस्ट, श्री खंडोबा देवस्थान व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, बालाजी देडगाव यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तरी दत्त जन्म सोहळ्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन दत्त मंदिर उत्सव समिती यांनी केले आहे.