चाइल्ड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेस प्रारंभ

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेची आयोजन करण्यात आले आहे. सदरची कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्कूल चे प्राचार्य रवींद्र गावडे यांनी केले आहे.कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य व वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी व मराठी या दोन्ही विषयाच्या अक्षरांमध्ये बदल घडवण्यासाठी या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी 21 दिवस या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेली आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन सहज उपलब्ध होते पण ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सहसा संधी मिळत नाही. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले अक्षर काढा असे म्हणतात, पण नेमके चांगले काढा म्हणजे काय? खराब अक्षर म्हणजे काय?हस्ताक्षर सुधारण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे सर यांनी केले.
सदर कार्यशाळा तीन टप्प्यांमध्ये होणार असून अक्षर कौशल्य शिकवले जाणार आहे. महात्मा गांधी म्हणायचे सुंदर अक्षर हा चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा दागिना आहे म्हणूनच त्यांची प्रेरणा घेऊन सदर कार्यशाळा घेण्यात येत आहे. सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राचार्य व सर्व शिक्षक स्टाफ परिश्रम घेत आहेत.