नेवासा फाटा (प्रतिनिधी)- पत्रकारितेत मोठे बदल होत असून जलदगतीने सामाजिक घडामोडींचे आकलन पत्रकारितेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पत्रकारांनी या स्पर्धेचे युगात वास्तवतावादी पत्रकारिता करुन राजकारण आणि समाजकारणात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले. नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात आयोजित नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या पत्रकार दिन व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नेवासा फाटा येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज, प्रादेशिक परिवहन खात्याचे वाहन निरिक्षक अनंता जोशी, नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगेपाटील, नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जेष्ठ नेते रामराव पाटील भदगले, कृषी शास्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे, गणेशराव लंघे, मुकिंदपूरचे सरपंच दादा निपुंगे, भाजपाचे नेते अंकुशराव काळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे, एकता पञकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
नेवासा तालुका एकता पञकार संघाच्यावतीने आयोजित पञकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेञात उत्तुंग भरारी घेत शिक्षणाची जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी दालने उभी करुन ज्ञानार्जन करणाऱ्या ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगेपाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर पञकारिता क्षेञात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भेंडा येथील कारभारी गरड, घोडेगाव येथील दिलीप शिंदे तर बालाजी देडगाव येथील बन्सीभाऊ एडके यांना दर्पण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज, प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरिक्षक अनंता जोशी, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पञकार राजेंद्र वाघमारे, संदीप गाडेकर, चंद्रकांत दरंदले, सतीश उदावंत,अशोक पेहरकर,विनायक दरंदले, इक्कबाल शेख, युन्नूस पठाण, मकरंद देशपांडे, नामदेव शिंदे,गणेश बेल्हेकर,अभिषेक गाडेकर,सौरभ मुनोत, सचिन कुरुंद,सुधाकर होंडे,बाळासाहेब पंडीत, राहूल कोळसे,विकास बोर्डे,विलास धनवटे,सोमनाथ कचरे, देविदास कचरे,मोहन शेगर,अशोक भुसारी,राहूल चिंधे,संतोष सोनवणे,विठ्ठल उदावंत यांच्यासह तालुक्यातील पञकार यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमास मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, सामाजिक कार्यकर्ते महेश कांडके, शहर कॉंगेसचे अध्यक्ष अंजूम पटेल यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप गाडेकर, राजेंद्र वाघमारे, अशोकराव पेहरकर, चंद्रकात दरंदले, सतिष उदावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
