तेलकुडगाव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व आमदार लंघे पाटील यांचा नागरी सत्कार

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, प्रभाकर शिंदे काका पंचगंगा उद्योग समूह शुगर लि. संस्थापक, बाबासाहेब पाटील चिडे सरला बेट विश्वस्त व लक्ष्मी माता उद्योग समूह संस्थापक, करणजी नवले, राष्ट्रसह्याद्री संपादक अहिल्यानगर, गटविकास अधिकारी लखवाल साहेब, कर्डिले साहेब डेप्युटी इंजिनिअर, डॉ. कानडे सर, अंकुशराव काळे किसान मोर्चा, सतीश कर्डिले युवा नेतृत्व आदी मान्यवरांच्या हस्ते पुढील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

१)हनुमानगर रस्ता खडीकरण १० लक्ष, २)हाडोळा वस्ती रस्ता खडीकरण/कॉक्रेटीकरण ८ लक्ष, ३) ढोरजळगांव रस्ता खडीकरण १० लक्ष. ४) गावठाण विजपुरवठा ४ लक्ष. ५) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेट बसवणे. 70000 हजार. ६) नवबौद्ध घटक स्मशानभूमी तारकंपाऊंड १ लक्ष.
७) जि.प.शाळा हनुमानगर वॉल कंपाऊंड.१.५० लक्ष
८) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण तेलकुडगांव किचन शेड २ लक्ष.
९) चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल श्रीरामनगर बैठक व्यवस्था २.५० लक्ष.
१०) गावठाण ते श्रीरामनगर वैकुंठधाम स्मशानभुमी स्ट्रीट लाईट २ लक्ष.
११) देवस्थान परीसर (रोकडोबा / तरटी देवस्थान कंपाऊंड व दुरुस्ती) १ लक्ष. असे एकूण ४२ लक्ष रुपये कामाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शिंदे काका होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांचा तेलकुडगाव ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, तेलकुडगांव सोसायटी चेअरमन, व्हा
चेअरमन, संचालक, रेणुकामाता मंदिर देवस्थान, श्री. विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ, भिमशक्ती युवा प्रतिष्ठान, चैतन्य नागनाथ देवस्थान, ग्रामसेवक सर्व कर्मचारी वृंद, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण-हनुमाननगर, गावातील अनेक मान्यवर मंडळी-सहकारी, समस्त ग्रामस्थ तेलकुडगांव, मित्र परिवार यांनी नागरी सन्मान केला.
यावेळी आमदार लंघे पाटील म्हणाले, तेलकुडगाव ग्रामस्थांनी पुढेही एकोप्याने एकत्र काम करावे. नेवासा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तेलकुडगांवसाठी जास्तीत जास्त निधी देण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही आमदार लंघे पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सुचना शरद पाटील काळे यांनी मांडली व कानिफनाथ घोडेचोर यांनी अनुमोदन दिले. यावेळी सतिशराव काळे पाटील सरपंच, शरद पाटील काळे उपसरपंच, बालकनाथ काळे मा.सरपंच, अशोकराव काळे मा उपसरपंच, सुरेश काळे साहेब मा सरपंच, एकनाथ पा घोडेचोर उपसरपंच, भारत पा काळे मा उपसरपंच, महेश गटकळ, संतोष सरोदे, नामदेव घोडेचोर, बापू साळवे, ग्रामसेवक काळे बी.बी.भाऊसाहेब, नारायण पा. काळे, सुर्यभान घोडेचोर, श्री साईनाथ काळे, रेवन्नाथ पा काळे मा सरपंच, ज्ञानेश्वर पा काळे मा.चेअरमन, हभप अमोल महाराज घाडगे, हभप महेश महाराज घाडगे, हभप नवनाथ महाराज घाडगे, बाबुराव काळे तंटामुक्ती अध्यक्ष, शिवाजी घोडेचोर चेअरमन पो.पाटील, मुरलीधर काळे आप्पा, सुधाकर दादा राजहंस, बाबासाहेब काळे सर, भाऊसाहेब काळे,आत्माराम घोडेचोर, मच्छिंद्र काळे मा.उपसरपंच, आबासाहेब काळे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, समुदाय अधिकारी खवल सर, आरोग्य कर्मचारी चिलगर सर, पृथ्वीराज गटकळ, व्हा चेअरमन हरिश्चंद्र काळे, Adv.सचिन घोडेचोर, शिवाजी घोडेचोर, अर्जुन गायकवाड देवस्थान सचिव, भागचंद काळे, दत्तात्रय घाडगे, प्रा मधुकर घाडगे सर, बंडूतात्या घोडेचोर, महादेव काळे, सचिव खाटीक भाऊसाहेब, काकासाहेब काळे मा चेअरमन, अशोक काळे संचालक, दिगंबर काळे संचालक, मेजर पाडळे, आकाश चेडे, मच्छिंद्र मुंगसे, संभाजी लोंढे, संजय ताके, थोरे, नाथा घोडेचोर, शहाराम घोडेचोर, संजय घाडगे, एकनाथ गटकळ, संतोष काळे, सुनील राजहंस, शेटे संभाजी, राहुल घाडगे, आजीनाथ काळे, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, सुदाम काळे, भानुदास गटकळ, सरोदे मोतीराम, दानियल साळवे, नामदेव म्हस्के, प्रसाद घोडेचोर, रमेश घोडेचोर, बबनतात्या म्हस्के, संदिप घोडेचोर, सचिन काळे, छानदेव घोडेचोर, अशोक घाडगे, दत्तात्रय घाडगे, आदिनाथ थोरात, आत्माराम काळे, शेंडगे अंबादास, मधूकर काळे, लक्ष्मण काळे, दिपक घाडगे, सोपान शेंडगे, संजय घोडेचोर, दत्तुराजे काळे, राजुकाका घाडगे, शेंडगे ज्ञानेश्वर, आत्माराम काळे,चंद्रकांत गटकळ, अर्जुन कर्डिले, करन सरोदे, भगत बबन, दादा काळे, कोठे टेलर मामा, रामनाथ काळे, गौतम काळे, मच्छिंद्र काळे, संजय काळे, गौतमशेट गुगळे, कमलेश काळे, अंबादास शेंडगे, राजेंद्र तेलधुने, सोपान घोडेचोर, पत्रकार बन्शीभाऊ एडके, पत्रकार गणेश घाडगे, बन्शी म्हस्के, सरोदे अशोक, आकाश तेलधुणे, मिसाळ, कृष्णा सरोदे क्लार्क, सागर सरोदे शिपाई, विरेंद्र घोडेचोर शिपाई ज्ञानेश्वर घोडेचोर रोजगार सेवक आदी ग्रामस्थ उपस्थित होते. रेवन्नाथ काळे व शरद पाटील काळे यांनी मनोगत व्यक्त केले. हभप अमोल महाराज घाडगे यांनी यशस्वी शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी सोपानराव शेंडगे व त्यांच्या सौभाग्यवती यांनी भाऊ आमदार झाल्यानंतर केलेला नवस चैतन्य नागनाथ महाराजांना चांदीचा घोडा देवस्थाकडे जमा करून नवस पूर्ण केला.

पुढील काळात ग्रामस्तरावरील सर्व क्षेत्रात लक्ष घालून आपलं गाव विकसित व सुशासन युक्त गाव हेतुने अंगणवाडी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा उपाययोजना, दिव्यांग व दलितबांधव, देवस्थान, गावठाण, वाडी वस्ती, महिला बचत गट, ग्रामसंघ, एकल महिलासाठी उपाययोजना, घरकुल विभाग, गावातील सर्व परिसर, या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत, सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहून तेलकुडगांवचा विकास करण्यासाठी तेलकुडगांव ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्नशील राहुन जनसेवेचे काम करु असे प्रतिपादन यावेळी सरपंच सतिशराव काळे पाटील यांनी सर्वांच्या वतीने केले. सुत्रसंचलन राम काळे सर यांनी केले‌. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.