पै. माऊली जमदाडे ठरला ‘मंकावती केसरी’चा मानकरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा कुस्तीच्या मैदानात मानाच्या मंकावती केसरीचा मानकरी पै. माऊली जमदाडे ठरला आहे. त्यास आयोजकाकडून रोख एक लाख ५१ हजार रुपये व चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. यासह अर्जुन पुरस्कार विजेत्या व हरियाणा राज्यात तहसीलदारपदी कार्यरत असलेल्या पै. दिव्या कक्राल, राजस्थान येथील पीएसआय पै. नयना कैनवाल व बारामती येथील पै. भारत मदने यांना देखील चांदीची गदा व लाखो रुपयांची रोख बक्षीस देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त झालेल्या इतर सर्वच निकाली कुस्तीतील विजयी मल्लांना आयोजकाकडून रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्याच्या अशा स्वरूपाचे भव्य दिव्य मैदानाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. विजयी पैलवानांना सुमारे १३ लाखांची रोख बक्षिसे आयोजक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून देण्यात आली. यापुढे दरवर्षी अशाच स्वरूपाचे आयोजन केले जाणार असल्याची प्रतिक्रिया उपसरपंच अनिल घुले यांनी यावेळी दिली. यावेळी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर धायगुडे यांनी उत्कृष्ट निवेदन करत स्पर्धेत रंगत आणली. तर पंच म्हणून संभाजी निकाळजे, शुभम जाधव, वसंत फुलमाळी व किरण मोरे यांनी काम पाहिले. स्पर्धा पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, सरपंच विजयाताई पटेकर, उपसरपंच अनिलराव घुले,  ग्रामपंचायत सदस्य अमोल पालवे, ज्ञानदेव पागिरे, बबन भुजबळ, सुनील शिंदे, गोकुळ भिमराज लोंढे, सोपान घुले भाऊसाहेब शिरसाठ, विविध विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय गाडे, व्हा. चेअरमन बाळासाहेब भानगुडे, संचालक सुरेश तवार, श्रीधर लोंढे, मल्हारी आखाडे, जबाजी पांढरे, रघुनाथ पागिरे, आबासाहेब पालवे, बाबासाहेब कोकाटे, त्रिंबक दारकुंडे, सुभाष घुले, कडूचंद कोकाटे गुरुजी, पोलीस पाटील अशोकराव वाघमोडे, मुरलीधर रुपनर, शिवसेना तालुका संघटक गोकुळ लोंढे, ज्ञानदेव सानप सर, संजय आखाडे, मच्छिंद्र लोंढे, डॉ. बाळासाहेब शिंदे, संजय खेडकर, दिगंबर शिंदे, संजय भानगुडे, देविदास धनवटे, जनार्दन धनवटे, रामभाऊ बाचकर, शंकर गुलगे, दीपक आखाडे, शहादेव लोंढे तसेच समस्त ग्रामस्थ माका यांनी विशेष परिश्रम घेतले.