माका येथे बैलगाडा शर्यतीने यात्रा उत्सवाची सांगता

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील मंकावती देवीच्या यात्रा उत्सवाची आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते बैलगाडा शर्यत लाऊन या यात्रा उत्सवाची  मोठ्या उत्साहाने सांगता करण्यात आली. माका येथील मंकावती देवींच्या यात्रा उत्सवाचे देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी आयोजन करण्यात येत असत. या वर्षी देखील ट्रस्टकडून यात्रा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या यात्रा उत्सवाचे छबीना पालखी मिरवणूक तसेच बैलगाडा शर्यत हे कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरले. माका परिसरात प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे जुन्नर, नाशिक, मालेगाव, वैजापूर, येवला, बीड आदी ठिकाणाहून या बैलगाडा शर्यतीत जवळपास तीनशेच्या वरती बैलगाडा धारक शयर्तीसाठी आले होते. तसेच ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार बैलगाडा शौकिनांची उपस्थिती होती. या बैलगाडा शर्यतीसाठी शेवटचं बक्षीस ५१ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह देण्यात आलं.  या बैलगाडा शर्यततिचा शुभारंभ नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आला. या बैलगाडा शर्यतीत पंच म्हणून देवा पांढरे तसेच बंडू लाडके यांनी काम पाहिले. हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खंडू लोंढे, आबासाहेब पांढरे, आदिनाथ म्हस्के, संभाजी लोंढे, ॲड. गोकुळ भाताने, रामदास घुले, अण्णासाहेब लोंढे, सुदाम लोंढे, प्रा. स्वरूपचंद गायकवाड सर, सुभाष गाडे, बाबा लोंढे, जाकिर पठाण, ऋषिकेश देवकाते, प्रदीप मदने, गोवर्धन रुपनर, दिगंबर शिंदे, भानुदास मस्के, यादव शिंदे, प्रवीण शिंदे, प्रल्हाद शेंडगे, अशोक खेमनर, कामराज पालवे यांनी परिश्रम घेतले.‌