बालाजी देडगाव (प्रतिनधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी सलग्न कृषि महाविद्यालय सोनईच्या कृषिदुतांकडून ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रगतशील शेतकरी रेवन्नाथ काळे यांच्या कांद्याच्या आणी उसाचा प्लॉट वरती चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात कांदा आणी ऊस पिकावरील कीड व्यवस्थापन आणी रोग व्यवस्थापन,पिक उत्पादन,खत व्यवस्थापन,सेंद्रिय शेती आणि जैविक खतांचा वापर या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कृषि दूत सौरभ शिंदे याने सर्वांच्या स्वागताने केली. त्यानंतर कार्यक्रमाचे समन्वय डाॅ. अतुल दरंदले यांनी पिक व्यवस्थापनाचे फायदे सांगितले. तसेच कृषि महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम जसे माती पाणी परीक्षण, जैविक खते (गांडूळखत) नर्सरी विषयी माहिती दिली. त्यानंतर विषय तज्ञ प्रा. सोमनाथ तागड ( उद्यान विद्या विभाग) यांनी फळबाग व्यवस्थापन बद्दल तर,नरेंद्र दहातोंडे (कीटक शास्त्र विभाग) यांनी कांदा व ऊस पिकावरील कीड नियंत्रण आणि तसेच प्रा. श्रीकृष्ण हुरुळे (रोग शास्त्र विभाग) यांनी कांदा पिकावरील रोग नियंत्रण, बीज प्रक्रिया आणि जैविक खतांचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाचा कांदा व इतर पिकावर होणारा परिणाम आणि त्यावर उपाय तसेच उपयुक्त जिवाणूंचा पिकावर होणारा फायदा याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले, यावेळ उपस्थिती सरपंच सतिशराव काळे यांनी शासनाच्या विविध योजनेबद्दल माहिती दिली. यादरम्यान शेतकऱ्यांकडून विविध प्रश्न विचारण्यात आले आणि तज्ञांकडून त्या प्रश्नांचे उत्तरे देखील देण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल गोंधळी व डाॅ. सतिश चौगुले इतर विशेष तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले. या शेतकरी चर्चासत्राला तेलकुडगावचे सरपंच, उपसरपंच,तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सतिशराव काळे यांनी केली. यावेळी इतर कृषिदूत आदित्य बाणखेले, सौरभ शिंदे, आदित्य सोले, हर्षल ऊईके, सिद्धांत उदावंत उपस्थित होते. या चर्चासत्रातून शेतकऱ्यांना शेतीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन प्रेरणा व दिशा मिळाली.
