माका महाविद्यालयाच्या शिबिराचा बालाजी देडगाव येथे शुभारंभ

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन बालाजी देडगाव येथील बालाजी मंदिर सभागृहात उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे होते. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, उपाध्यक्ष सुभाषशेठ चोपडा, विश्वस्त रामभाऊ कुटे, महागणपती देवस्थानचे अशोक मुंगसे, सेवा संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे सर, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युनुस पठाण, संजय मुंगसे (जय हरी) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निखिल निपुंगे यांनी केले. अध्यक्ष निवड प्रा. शहाबाज सय्यद यांनी केली तर अनुमोदन प्रा. मंदार कुलकर्णी यांनी दिले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दत्ता कोकाटे यांनी करून दिला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, अशोक मुंगसे, सागर बनसोडे व डॉ. अमोल दहातोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भक्ती बजांगे यांनी केले तर आभार प्रा. अमोल दरंदले यांनी मानले.