देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळावा उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पारंपरिक पद्धतीने उखाणा, विविध खेळ, महिला जागर, बेटी बचाव बेटी पढाव, महिलांचे आरोग्य, शालेय कामकाज आदी विषयांवर उपक्रम व चर्चासत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांना, महिलांना वाण, खाऊ वाटप करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, दानियल दळवी, पोपट मुंगसे, बन्सीभाऊ मुंगसे, आनंद दळवी, उत्तम सकट, प्रकाश दळवी, प्रविण दळवी, अविनाश दळवी, अविनाश तांबे, येशूदास दळवी, ईश्वर भवार, गहिनीनाथ भवार, मयुर कोल्हे यांचे व पालकांचे सहकार्य लाभले. रोहिणी लोंढे, गौरी सकट, कविता सकट, प्रिती सकट, योगिता तांबे, सिमा कोल्हे, रेशमाबाई दळवी, रिमा पिंपळे, सोनाली दळवी, कांताबाई दळवी, कावेरी दळवी, अर्चना दळवी, पूजा दळवी, वनिता दळवी, सुरेखा दळवी, संध्या भवार, सारिका कोल्हे, सुमन दळवी, सोनाली भवार, सिंधुबाई दळवी, बेबीताई हिवाळे, बबिता दळवी, द्वारकाबाई दळवी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ व आभार सहशिक्षिका मनिषा कांबळे यांनी मानले.