देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य पोपटराव मुंगसे, सुषमाताई दळवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम सकट, प्रदिप मिरपगार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, आनंद दळवी, अविनाश दळवी, सनी आढाव, संदीप मिरपगार, योसेफ दळवी, गणेश गायकवाड, प्रकाश दळवी, कडुभाऊ दळवी, श्रावण दळवी, सुभाष दळवी, विठ्ठल दळवी, संतोष दळवी, योसेफ वसंत दळवी, संतोष दगडू दळवी, संभाजी चेडे, आण्णासाहेब दळवी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी देडगाव ग्रामपंचायतचे नवनियुक्त उपसरपंच बाळासाहेब मुंगसे यांचा सत्कार करण्यात आला. शालेय गुणवत्ता, विविध उपक्रम, प्रगतीबद्दल यावेळी अभिनंदन करत शाळेला सर्वोपतरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रोहिणी लोंढे, गौरी सकट, कविता सकट, प्रिती सकट, योगिता तांबे, सिमा कोल्हे, रेशमाबाई दळवी, छाया कांबळे, वर्षा हिवाळे, रिमा पिंपळे, सोनाली दळवी, कांताबाई दळवी, कावेरी दळवी, अर्चना दळवी, पूजा दळवी, वनिता दळवी, सुरेखा दळवी, संध्या भवार, सारिका कोल्हे, सुमन दळवी, सोनाली भवार, सिंधुबाई दळवी, बेबीताई हिवाळे, बबिता दळवी, द्वारकाबाई दळवी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ व आभार सहशिक्षिका मनिषा कांबळे यांनी मानले. शाळेच्या विविध उपक्रमांना गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड साहेब, विस्ताराधिकारी शेख मॅडम, केंद्रप्रमुख कमल लाटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.