बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ताईबाई बबनराव भानगुडे (वय ५८) यांचे दुःखद निधन झाले. त्यांना परिसरात ताईबाई या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने माका परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू , पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे, दीर असा मोठा परिवार आहे. माका ग्रामपंचायतचे माजी सरपंच बबनराव भानगुडे यांच्या त्या पत्नी होत.
