बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ धर्म ध्वजारोहणाने करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांच्या शुभहस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रमुख मान्यवर म्हणून हभप सुखदेव महाराज मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष कुंडलिक कदम, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, चांगदेव तांबे, व्हा. चेअरमन जनाभाऊ देशमुख, माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, महादेव पुंड, भाजपचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, सतीश मुथ्था, पांडुरंग रक्ताटे, दादा एडके, दादा वाहूरवाघ, मच्छिंद्र कदम, गंगाधर कदम, मधुकर क्षिरसागर, अॅड. बाबासाहेब मुंगसे ,बहिरनाथ एडके आदी उपस्थित होते. यावेळी संदीप नांगरे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विशेष योगदानाबद्दल अॅड. बाबासाहेब मुंगसे व चाॅंद पठाण यांचा कैलासनाथ मित्रमंडळाकडून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलासनाथ मित्रमंडळाचे राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, विठ्ठल क्षिरसागर आदी सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.
२० फेब्रवारी ते २७ फेब्रुवारी यादरम्यान होणाऱ्या या सप्ताहकाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात बुधवारी (ता.१९) शिवजयंती व शिवभक्त कै. कनकमल मुथ्था (काका) यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त हभप घनश्याम महाराज शिंदे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तर गुरुवारी (ता.२०) सकाळी धर्म ध्वजारोहण करण्यात आले.
या सप्ताह काळामध्ये मनोहर महाराज शिनारे (मालुंजा) हभप सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), अमोल महाराज बडाख (मालुंजा), अशोक महाराज कोंगे (ज्ञानेश आश्रम, पाथर्डी), तुकाराम महाराज केसभट (वाघोली), भाऊसाहेब महाराज अन्हाड (दहिगाव साकता), प्रवीण महाराज गोसावी (पैठण) यांच्या कीर्तनसेवा होणार आहेत. तर मंगळवारी (ता.२५) सकाळी १० वाजता गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज सदिच्छा भेट देणार आहेत. तर गुरुवारी (ता.२७) सकाळी ९ ते ११ राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदी) यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने यात्रेची सांगता होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कैलासनाथ मित्रमंडळ, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांनी केले आहे.
