बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गणपत शिंदे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. अॅड. कुणाल शिंदे व विशाल शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
