कुंडलिक बाबुराव मुंगसे पाटील यांचे मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील माजी सरपंच व ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक बाबुराव मुंगसे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि. ११ मार्च २०२५ रोजी होणार आहे. यानिमित्त मुंगसे वस्ती येथे महंत हभप समाधान महाराज भोजेकर (जळगांव) यांचे सकाळी ९ ते ११ यावेळेत किर्तन होणार आहे.

कुंडलिक मुंगसे पाटील यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योदगान आहे. त्यांची राजकीय कारकिर्द मोठी आहे. त्यांची सार्वजनिक राजकारणातील सुरुवात काॅलेज काळातच झाली. नेवासा काॅलेज येथे बी.ए. चे शिक्षण घेत असताना ते विद्यालयाच्या जी. एस. पदाची निवडणूक जिंकले होते. त्यांनी सुमारे २० वर्षे बालाजी देडगावचे सरपंचपद भुषवले. तसेच ज्ञानेश्वर सहकारी साखर साखर कारखान्याचे ते संचालक होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने बालाजी देडगाव परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती लता कुंडलिक मुंगसे (पत्नी), श्रीमती सिंधू मुरलीधर मुंगसे (भावजई), सचिन कुंडलिक मुंगसे (मुलगा), बाळासाहेब कुंडलिक मुंगसे (मुलगा), सौ. स्वाती दिनकरराव आरगडे (मुलगी), नितीन मुरलीधर मुंगसे (पुतणे), अ‍ॅड. राहुल मुरलीधर मुंगसे (पुतणे), सौ. डॉ. अर्चना नितीन भराट (पुतणी), सविता कमलेश काकडे (पुतणी) व समस्त मुंगसे पाटील परिवार यांनी केले आहे.