नागेबाबा मल्टीस्टेटतर्फे देडगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना अनेक उपक्रम राबवत असते. या संस्थेच्या देडगाव शाखेत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे सर यांनी प्रस्ताविकात उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एडीसीसी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब मुंगसे साहेब, महादेव बनसोडे सर, प्रगतशील शेतकरी निवृत्ती तांबे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युनूस पठाण, बापूसाहेब म्हस्के, आदिनाथ पुंड, भाऊसाहेब बनसोडे, लक्ष्मण वैरागर, निलेशभाऊ कोकरे, रामदास बनसोडे, उत्तम मुंगसे, कैलास कोलते, नितीन हिवाळे, भगवान कुटे, सुरेंद्र बनसोडे सर, संपत ससाणे, प्रशांत फुलारे, दीक्षित भागवत, कॅशियर योगेश भारती, राहुल मुंगसे, अक्षय तिडके, सभासद व खातेदार उपस्थित होते. शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी आभार मानले.