बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज देवस्थानला महंत सुनीलगिरीजी महाराजांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी संत रोहिदास महाराज मूर्तीचे महंत सुनीलगिरीजी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, संत रोहिदास महाराज देवस्थानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पावन गणपती देवस्थानचे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे, माजी चेअरमन राजाराम मुंगसे, बहिरनाथ मुंगसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने सुनीलगिरीजी महाराजांचा सन्मान करण्यात आला. शेवटी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
