देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम यशस्वी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम घेण्यात आला. शाळेत प्रथम नव्याने हजर झालेल्या मुख्याध्यापिका श्रीमती वनिता चिलका, सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेच्या परिसरातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर येथे परिसर भेट देण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. चार भिंतीच्या बाहेर निसर्गाची शाळा विद्यार्थ्यांना चांगलीच आवडली. विद्यार्थ्यांनी बालगीतांचा आनंद घेतला.
या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे, ग्रामपंचायत सदस्या उषाताई गायकवाड, उपाध्यक्ष आजीनाथ वांढेकर, कृषी अधिकारी संजय कदम, प्रा. जालिंदर कदम, बाबासाहेब मुंगसे, नितीन कदम, विलास म्हस्के, रघुनाथ कुटे, अर्जुन नजन, गणेश कुटे तसेच सुभद्रा कदम, सुवर्णा कदम, सिंधुबाई कदम, शोभा कदम, जयश्री कदम, मनिषा कदम, परिगा कदम, सविता कदम, अनिता कदम, सुनिता मुंगसे, सुनिता कदम,अक्षय तांबे, लता ताके, हौसाबाई ताके,अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे, मदतनीस राधिका मुंगसे यांचे व पालकांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन मुख्याध्यापिका वनिता चिलका व आभार सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी मानले.