तक्षशिला विद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार; संस्थापक प्रा. विजय कदम यांचा भव्य नागरी सत्कार 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देडगाव  येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाला प्रतिष्ठित समजला जाणारा ‘टॉप स्कूल ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल बालाजी देडगाव ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने तक्षशिला विद्यालयाचे संस्थापक मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, प्राचार्य ज्ञानदेव कदम सर, कृषी अधिकारी संजय कदम साहेब, पावन गणपती देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य पोपट मुंगसे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, खंडेश्वर तांबे, जनार्दन देशमुख, तक्षशिला स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक,सुनिल मुंगसे सर माजी चेअरमन भानुदास पाटील मुंगसे, पत्रकार इन्नुस पठाण, माजी चेअरमन राजाराम मुंगसे, संजयकुमार लाड सर, गिरजू गोयकर, माजी चेअरमन संदेश मुंगसे, तांदळे साहेब, माजी सरपंच मच्छिंद्र मामा कदम, बाळासाहेब कदम, किशोर कदम, गोरखनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या सत्काराबद्दल प्रा. डॉ. विजय कदम यांनी सर्वांचे आभार मानले तसेच हा पुरस्कार विद्यालयातील कुशल शिक्षक आणि हुशार विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नांमुळे तसेच संत- महंताचा आशिर्वाद व गावकऱ्यांच्या साथीमुळे प्राप्त झाला असल्याचे मत प्रा. विजय कदम यांनी यावेळी व्यक्त केले.