देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवाजी लांघे, लेवीय तिजोरे या शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवाजी लांघे सर व लेवीय तिजोरे सर यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ पाटील कुटे, प्रमुख पाहुणे कृषी अधिकारी संजय पाटील कदम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे, उपाध्यक्ष अदिनाथ वांढेकर, चंद्रकांत मुंगसे, भानुदास कुटे, मधुकर वांढेकर, जालिंदर वांढेकर, नितीन कदम, सोमनाथ ताके,अमोल ताके,गणेश मुंगसे,देविदास मुंगसे,अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे,मदतनीस राधिका मुंगसे,लताबाई मोहन ताके,जिजाबाई नामदेव कदम,अलका अशोक कदम,प्रतिक्षा प्रदिप कदम आदि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोगतात रघुनाथ पाटील कुटे,संजय पाटील कदम,शिवाजी लांघे सर, लेवीय तिजोरे सर,अमोल कुटे यांनी आपले विचार मांडले.विद्यार्थी,पालक,शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते लांघे सर व तिजोरे सर यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व भारावून गेले होते. दोन्ही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,मिष्टान्न भोजन व शाळेला भेटवस्तू देण्यात आली. शाळेतील गुणवत्ता, व्यवस्थापन व विविध उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करत भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेतील विविध उपक्रमांना गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्ताराधिकारी मिरा केदार,केंद्रप्रमुख कमल लाटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. समारंभाला सहकार्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी तर संयोजन मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी केले.आभार सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी मानले.