स्व. वकीलराव लंघे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व.आमदार वकीलराव लंघे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, मुुख्याध्यापक सतीशकुमार भोसले, ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब सावंत, संभाजी कडू, अंबादास बोरुडे, सुवर्णा काळे, संध्या मुंगसे, सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब सावंत यांनी केले. तर अंबादास बोरुडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.