बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- लेखक संदीप नांगरे यांनी लिहिलेल्या ज्ञानाचार्य या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते निपाणी निमगाव येथे करण्यात आले. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाचे (तेव्हाचे न्यू इंग्लिश स्कूल देडगाव) पहिले मुख्याध्यापक मोती चंद्रभान आदमने यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर तसेच त्यांच्या आठवणीवर आधारित हे पुस्तक संदीप गोरक्षनाथ नांगरे यांनी लिहिले आहे. आदमने सर यांचा प्रथम स्मृतिदिन त्यांच्या जन्मगावी म्हणजेच निपाणी निमगाव (ता. नेवासा) येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. संदीप नांगरे हे प्राथमिक शिक्षक असून ते सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबे वस्ती येथे कार्यरत आहेत. साहित्य व संगीत क्षेत्रातला त्यांचा व्यासंग दांडगा आहे.यावेळी रंगनाथ पाटील शेटे, एस बी शेटे,आशाताई मुरकुटे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बी एन मोटे, अतुल महाराज आदमने, शिवाजी पाटील जंगले, महादेव गरड, विश्वास पाटील बानकर, सुरेश पाटील शेटे, ऋषिकेश पाटील शेटे, स्व. आदमने सर यांचे सहकारी शिक्षक दहातोंडे सर, चामुटे सर, शिरोळे सर, माजी विद्यार्थी संघाचे भास्कर तांबे, खंडेश्वर कोकरे, संजयकुमार लाड, सर्जेराव ससाणे, बथुवेल हिवाळे, नवनाथ फुलारी, नितीन गायकवाड, संजय वांढेकर,राजू बनसोडे, नांगरे गुरुजी, राजू आदमने, संदीप आदमने व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
