बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती कारभारी चेडे होते. ध्वजारोहण माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक जनार्धन काका कदम, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, कडूभाऊ तांबे, लक्ष्मण बनसोडे, कारभारी मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, निलेश कोकरे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, गणेश शेटे, बन्सीभाऊ मुंगसे, संपत ससाणे,
सुभाष मुंगसे, रामेश्वर गोयकर, लक्ष्मण गोयकर, अशोक मुंगसे, नारायण बनसोडे , सर्जेराव चामुटे सर, कदम सर, देवकाते मेजर, प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड आदींसह माजी विद्यार्थी संघातील सर्व सदस्य, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.


