अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.96 टक्के

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.96 टक्के लागला. विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली. यंदाही मुलींनी बाजी मारली.
विद्यालयात गुणानुक्रमे तेजस्विनी रामचंद्र कदम 90.80 टक्के प्रथम, ताराचंद ज्ञानदेव होंडे 86.60 टक्के द्वितिय, आदित्य एकनाथ टाके याने 85.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तर ओंकार अंकुश सोनवणे याने 84.40 टक्के गुण मिळवत चतुर्थ तर  मिळवले गौरी संभाजी मुंगसे हिने 83.60 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला. अहिल्याबाई होळकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख व डॉ. निवेदिता गडाख, मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे तसेच शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड, सहशिक्षक ज्ञानदेव कदम सर, दत्तात्रय तोडमल, दसपुते सर, सचिन कोठुळे सर, सुभाष कोलते सर, भुजबळ सर, कृष्णा कोलते सर, गोयकर सर, सुरेंद्र बनसोडे सर, अक्षय मीरपगार सर, ज्योती पंडित मॅडम आदी शिक्षकांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. तसेच परिसरातूनही कौतुकाचे वर्षाव होत आहे.