क्षिरसागर परिवाराच्या हस्ते महादेव मंदिरात अभिषेक व आरती

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर देवस्थान येथे तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त संदेश मधुकर क्षिरसागर व श्रावणी संदेश क्षिरसागर यांच्या शुभहस्ते अभिषेक व आरती करण्यात आली. तसेच हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली शिवलीला ग्रंथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. यानंतर क्षिरसागर परिवारकडून भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, पांडुरंग महाराज रक्ताटे, कैलासनाथ देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कदम, मधुकर क्षिरसागर, विठ्ठल क्षिरसागर, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, नवनाथ गोयकर, कानिफनाथ गोयकर, विजय चेडे, चांगदेव महाराज तांबे, संदेश क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी महादेव मंदिर देवस्थान, कैलासनाथ मित्र मंडळ व क्षिरसागर परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.