बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कौठा येथील ग्रामपंचायत सदस्य राजू वाघ यांच्या वतीने राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेतराजे संभाजी माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये अनुक्रमे माधुरी अर्जुन डाके 88.80 टक्के, स्नेहल सोपान शेंडकर 84.50 टक्के, शुभांगी शिवाजी भासार 81.60 टक्के, शुभम शिवाजी फरताळे 78.40 टक्के, पल्लवी परसराम पोटे 76.40 टक्के यांनी प्रथम पाच क्रमांक पटकावले. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर मुख्याध्यापक उद्धवराव सोनवणे व सर्व स्टाफचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुनिल जावळे, ज्ञानेश्वर शिरसाठ, मिनीनाथ वाघ, पत्रकार काळे आदी उपस्थित होते.