बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील व्यंकटेश पाणी वाटप संस्थेचे विद्यमान चेअरमन व मा. प्राचार्य मुरलीधर दहातोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ५०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, म.ल. हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान परिसरात ५०१ झाडे लावून दहातोंडे सर यांचा अभिष्ठचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.
पावन महागणपती देवस्थानच्या परिसरामध्ये पावन महागणपती मित्र मंडळ व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही वृक्षलागवड डेन्स फॉरेस्ट व मियां वाकी पद्धतीने करण्यात आली. दहातोंडे सर यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला पूर्णविराम देत या परिसरामध्ये ५०१ विविध प्रकारची वृक्ष लागवड करून आगळावेगळा वाढदिवस साजरा करून समाजापुढे आदर्श ठेवला.
यावेळी प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. त्यानंतर सन्मान सोहळा व अभिष्टचिंतन सोहळा गणपती देवस्थानच्या सभागृहात करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे यांनी केले. तर ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके ,आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत, चाइल्ड इंग्लिश करिअर स्कूलचे संस्थापक सागर बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष भाषण माणिकराव होंडे पाटील यांनी केले तर सत्कारास उत्तर देत दहातोंडे सर यांनी या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती देत यापुढेही असेच काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने दहातोंडे सरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माका गावचे उपसरपंच अनिलराव घुले, चेअरमन मल्हारी आखाडे ,प्रगतशील शेतकरी तुळशीराम तांबे, देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे, विश्वस्त बन्सी आप्पा मुंगसे, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, श्री ट्रॅव्हल्स कं. संस्थापक शिवाजीराव उबाळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी, संभाजीराव पठाडे, प्रवीण मुंगसे सर, महेश चेडे, संकेत मुंगसे, मा. पर्यवेक्षक चामुटे सर, मल्हारी अंधारे, शिवम कुटे, वायरमन सतीश हंडाळ साहेब , तुळशीराम कचरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार माऊली गोयकर यांनी मानले.
