एकलव्य संघटनेच्या चिलेखनवाडी शाखेचे उद्या उद्घाटन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे येथे उद्या रविवार (ता.२८) एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या शाखेचे उद्घाटन सकाळी ११.३० वाजता एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती बालाजी देडगाव येथील एकलव्य संघटनेचे जिल्हा संघटक शिवाजीराव थोरात यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे महासचिव किरण ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष अंकुश सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष विलास मोरे, प्रदेश उपाध्यक्ष रतन सोनवणे, प्रदेश सचिव सुरेश ठाकर, प्रदेश सचिव मोठाभाऊ दळवी, प्रदेश सचिव नितीन मोरे, राज्य संघटक बाळासाहेब गांगुर्डे, राज्य संघटक अ‍ॅड. राजन वाघ, राज्य संघटक अशोक माळी,अ‍ॅड. सादिक शिलेदार साहेब, जिल्हा संघटक शिवाजीराव थोरात तसेच राज्यभरातील विविध जिल्ह्यातील संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन एकलव्य टायगर फोर्स चिलेखनवाडी यांनी केले आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संघटक शिवाजीराव थोरात यांनी केले आहे.