बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत माऊली मल्टीस्टेटतर्फे उद्या १५ ऑगस्टनिमित्त देडगाव येथील प्राथमिक शाळेत तसेच माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सुनिल शिरसाठ यांनी दिली. श्री संत माऊली मल्टीस्टेटच्या सातव्या शाखेचे १ सप्टेंबर रोजी देडगाव येथे उद्घाटन होणार आहे.
संतांची शिकवण व त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या या संस्थेने आजवर विविध सामाजिक ,धार्मिक, अध्यात्मिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ही संस्था करीत आहे. गरजूंना वेळोवेळी शैक्षणिक मदत देऊन त्यांना शिक्षणास हातभार लावत आहे. या त्यांच्या आजवरच्या धार्मिक कार्यासाठी त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे. या संस्थेमार्फत उद्या पाथर्डी, नेवासा, शेवगाव भागांतील एकूण २५ शाळा, महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सुनील शिरसाठ यांनी दिली.
