श्री. संत माऊली मल्टीस्टेटतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री. संत माऊली मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड (तिसगाव अर्बन )यांच्याकडून शाळेतील गरीब ,होतकरू, गुणवंत शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना दप्तरबॅग व राष्ट्रगीत ,भाषणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी वाटप करण्यात आले.
श्री. संत माऊली मल्टीस्टेट ही संताची शिकवण व त्यांच्या विचारावर आजवर विविध सामाजिक धार्मिक अध्यात्मिक कार्यात उल्लेखनीय कार्य केले आहे .अनेक शाळांमध्ये शैक्षणिक वस्तूचे वाटप केले आहे. ही संस्था राज्याच्या विविध पुरस्काराने सन्मानित झालेली असून या संस्थेची तिसगाव प्रमुख शाखा आहे. तर पाथर्डी ,कोरडगाव, ढोरजळगाव, तेलकुडगाव, भातकुडगाव येथे उपशाखा आहेत. ही ३६५ दिवस अविरत सेवा देणारी नावजलेली संस्था आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अहिल्याबाई होळकर शाळेत पाचवी ते नववीपर्यंत प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांक ट्रॉफी वाटप करण्यात आली. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भाषणे करणारे व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ट्रॉफी व बॅगचे वाटप करण्यात आले. ज्या ठिकाणी संस्था कार्यरत आहेत त्या गावातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॉफी व बॅगचे वाटप स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आले. या वाटप सोहळ्याप्रसंगी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे , माजी सभापती कारभारी चेडे, माजी चेअरमन लक्ष्मण बनसोडे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच महादेव पुंड, चेअरमन बाबासाहेब मुंगसे , ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके , देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथा, युवा नेते निलेश कोकरे, मच्छिंद्र मुंगसे, पोपट बनसोडे, नितीन हिवाळे ,दिलदार सय्यद ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाने, नागेबाबा मल्टीस्टेटचे पांडुरंग एडके, राज पतसंस्थेचे संतोष टांगळ , माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळाचे प्राचार्य सतीश भोसले सर व सर्व शिक्षक वृंद ,शाखेचे कर्मचारी अजित मुंगसे, लक्ष्मण गोफने, तेलकुडगाव शाखेचे कृष्णा घाडगे, अनिल घोडेचोर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. येत्या १ सप्टेंबर रोजी श्री संत माऊली मल्टीस्टेटचे नूतन उद्घाटन शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून देडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती शाखेच्या कर्मचारी सायली घोडके यांनी केली आहे.