बालाजी देडगाव येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व अहिल्याबाई होळकर विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद केंद्र शाळेत झालेल्या कार्यक्रमात सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते तर अहिल्याबाई होळकर विद्यालयात माजी सरपंच बाजीराव मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती कारभारी चेडे होते. केंद्र शाळा देडगाव येथे गावच्या मान्यवर मंडळीच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी लावलेल्या शंभर विविध देशी झाडांचा वाढदिवस वृक्षासमोर केक कापून साजरा करण्यात आला.ग्रामपंयातसमोर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच बाजीराव मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे, ज्ञानेश्वरचे संचालक जनार्दन कदम, माजी चेअरमन लक्ष्मण बनसोडे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी उपसरपंच दत्ता पाटील, महादेव पुंड, बन्सी मुंगसे, नवनाथ मुंगसे ,निलेश कोकरे, काळे मेजर, सोमनाथ मुंगसे मेजर, सोनवणे भाऊसाहेब, काशिनाथ टकले, माणिक फुलारी, सुनिल मुथा, अर्जुन कोकरे व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात उद्योजक रजनीकांत हिवाळे, प्राचार्य गायकवाड आदी प्रमुख मान्यवर व शिक्षक वृंद उपस्थित होते. संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिन विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही केंद्र शाळा देडगावमध्ये गावच्या मान्यवर मंडळीच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी लावलेल्या शंभर विविध देशी झाडांचा वाढदिवस वृक्षासमोर केक कापून साजरा करण्यात आला. देडगावचे दानशूर भूमिपुत्र राजेंद्र लाड साहेब यांनी वड, पिंपळ ,कडूनिंब ,चिंच ,अशोका अशी शंभर देशी झाडे बथूवेल हिवाळे आणि मुख्याध्यापक सतीश भोसले यांच्या मदतीने शालेय आवारात लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. या झाडाचे संरक्षण करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ देडगाव बॅच 2003 यांनी प्रत्येक झाडाला जाळ्या बनवूनही दिल्या होत्या. सर्व झाडे स्वातंत्र्यदिनी गावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच बाजीराव मुंगसे ,कारभारी चेडे, शालेय व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष सोपान मुंगसे, दिलदार सय्यद व मुख्याध्यापक सतीश भोसले व सहकारी यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले होते.यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना उपस्थित मान्यवरांच्या नजरेत झाडांनी गजबजलेला परिसर भरला तेव्हा गावच्या शाळेतील झाडांचा वाढदिवस करण्याची कल्पना विद्यमान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाणे यांनी मांडली आणि केक आणून सर्व झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच यावेळी स्नेहल नितीन हिवाळे या विद्यार्थिनींचाही वाढदिवस सर्व मुलांना वही पेन वाटून साजरा केला. तर तिसगाव अर्बन अर्थात श्री संत माऊली पतसंस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड स्कूल बॅग आणि शालेय विद्यार्थी वक्त्यांना ट्रॉफीचे वितरणही करण्यात आले.
या कार्यक्रमाच्यावेळी आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत, दत्तात्रय धामणे, कविता करांडे, सुवर्णा जाधव,अश्विनी कदम यांसह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दानीयल हिवाळे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या गोड स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.