आमदार गडाख यांना पुन्हा विधानसभेवर पाठवायचे आहे: खासदार वाकचौरे

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार शंकराव गडाख यांना पुन्हा विधानसभेवर पाठवून नेवासा तालुक्यामध्ये भरघोस विकासाकामे करायचे आहेत. म्हणून पुन्हा एकदा तालुक्यावर उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे नागनाथ देवस्थान सभागृहामध्ये शिवसेनेचा भगवा सप्ताह शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे […]

सविस्तर वाचा

नगर जिल्ह्यात आजपासून चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 

जनशक्ती (वृत्तसेवा)- नगर जिल्ह्यात आजपासून म्हणजे 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 या दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यानुसार, नगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना पुढीलप्रमाणे […]

सविस्तर वाचा

तेलकुडगावात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे ग्रामपंचायत सचिवालयासमोर ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच लताताई सतिशराव काळे व उपसरपंच सुरेखा शरद काळे व ग्रामसेवक बी.बी.काळे भाऊसाहेब, तलाठी मलदोडे भाऊसाहेब यांनी तिरंगा ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. स्वांतत्र्यदिनाच्या निमित्त जि.प.प्रा.शाळा काळे वस्ती शाळेस ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांना १,२५,००० रू.इंटरॅक्टिव्ह पॅनल […]

सविस्तर वाचा

मंत्री, आमदारांनी विचार करुन बोला; मुख्यमंत्र्यांनी सुनावले 

जनशक्ती (वृत्तसेवा)- आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया देत आमदारांना दम दिला आहे. प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्या आहेत. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवरती परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. आज महाराष्ट्र […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे कुशाबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील टकले वस्ती येथे कुशाबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण श्रीराम साधना आश्रम रामनगरचे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराजांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाचे दोन दिवसापासून आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि.८) मूर्तीची गावातून फटाक्याच्या आतषबाजीमध्ये, पारंपारिक नृत्य, गजढोल, गजनृत्य व महिलांचे पारंपारिक भावगीते तसेच विविध कार्यक्रमाने सजवलेले […]

सविस्तर वाचा

पांढरीपुल येथे कंटेनरची आठ वाहनांना धडक; १० ते १५ जण जखमी

जनशक्ती (वृत्तसेवा)- नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल येथे नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना मागील बाजूने जोरदार धडक दिली. या घटनेत सुमारे १० ते १५ जण जखमी झाले आहेत. आज सोमवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर काही अंतरावर जाऊन कंटेनर चालक वाहन सोडून पळून गेला. अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र यात्रोत्सवाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र यात्रा उत्सवाचे उद्या शुक्रवार (ता.२६) आयोजन करण्यात आले आहे. बालाजी देडगाव येथील देडगाव-कुकाणा रोडवर असलेल्या राजा वीरभद्र देवस्थानमध्ये या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण नेवासा पंचायत समितीच्या […]

सविस्तर वाचा

वंचित बहुजन आघाडीच्या नेवासा तालुका संघटकपदी उत्तम सकट यांची निवड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका नवनिर्वाचित पदनियुक्ती सत्कार समारंभ नेवासा फाटा येथे संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेवासा तालुका संघटकपदी देडगाव येथील उत्तम सकट यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तालुका संघटक उत्तम संकट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थित उत्कर्षाताई रुपवते (राज्य प्रवक्ते) व विजय अंकल गायकवाड […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती शाळेच्या बालदिंडीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबे वस्ती येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. तर मुलींनी कलश सजवून आणले होते. यावेळी शिवाजी तांबे व निवृत्ती तांबे यांनी बालदिंडीला चहा व नाश्ता दिला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे, […]

सविस्तर वाचा

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावले

जनशक्ती (वृत्तसेवा)- मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत तैनात असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्याची […]

सविस्तर वाचा