देडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांची सदिच्छा भेट

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त येथील महादेव मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कैलासनाथ मित्रमंडळ व देडगाव ग्रामस्थांच्या वतीने हभप भास्करगिरीजी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले. यावेळी भास्करगिरीजी महाराज यांनी महादेव मंदिर समोरील कामाची पाहणी केली. यावेळी हभप […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव ग्रामपंचायतकडून ९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2. महाआवास अभियान उपक्रम अंतर्गत तेलकुडगाव ग्रामपंचायत वतीने ९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, ग्रामविकास पंचायतराज विभाग यांचेकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2.” अंतर्गत महाआवास अभियान उपक्रम निमित्त विकसित भारताचे स्वप्न घेऊन वाटचाल करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित […]

सविस्तर वाचा

प्रधानमंत्री आवास योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा: सरपंच चंद्रकांत मुंगसे

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत देडगाव येथील ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून त्या लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम पूर्ण करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा दोन) अंतर्गत ग्रामपंचायत देडगावच्या वतीने ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे धर्म ध्वजारोहणाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ धर्म ध्वजारोहणाने करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांच्या शुभहस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रमुख मान्यवर म्हणून हभप सुखदेव महाराज मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष […]

सविस्तर वाचा

अक्षय कोरडेची महसूल सहाय्यकपदी निवड

नेवासाफाटा (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अक्षय कोरडे यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील अक्षयचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे वांबोरी गावातच झाले. अक्षय पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. वांबोरी येथील वारकरी विलास कोरडे यांचा अक्षय हा मुलगा आहे. वांबोरी पंचक्रोशीतील या तरुण युवकाने मिळविलेल्या […]

सविस्तर वाचा

चाईल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजची अलसबा शेख सुवर्णपदकाची मानकरी

जनशक्ती (वृत्तसेवा)- सायन्स ओलंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल सायन्स ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली व आई.एस.ओ मानांकन प्राप्त असलेली चाईल्ड करिअर जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी अलसबा शेख हिने नॅशनल लेव्हलच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सुवर्णपदक प्राप्त केले असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य रवींद्र गावडे […]

सविस्तर वाचा

मुळा धरणातून सोमवारी आवर्तन सुटणार: आमदार विठ्ठलराव लंघे पाटील

जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सुरु करण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता विखे पाटील यांनी आमदार लंघे यांची ही मागणी लक्षात घेवून सोमवार (दि.१७) फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. […]

सविस्तर वाचा

युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबीर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत सदस्य नोंदणी मोहीमेची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी सदस्य नोंदणीचे उद्घाटक म्हणून तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे साहेब यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित या सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री संत रोहिदास महाराजांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सेवा सहकारी संस्थेचे […]

सविस्तर वाचा

युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत देडगाव, सेवा सहकारी सोसायटी, बालाजी देवस्थान ट्रस्ट, पावन गणपती देवस्थान व श्री संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने युवा नेते मच्छिंद्र […]

सविस्तर वाचा