बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव ग्रामपंचायतच्या उपसरंपचपदी बाळासाहेब मुंगसे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच बाळासाहेब मुंगसे यांचा बालाजी देडगाव येथील बळीराज्य संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, खंडू कोकरे गुरुजी,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, किशोर मुंगसे, विश्वास हिवाळे, सोपान मुंगसे, मल्हारी गोफणे, अरुण वांढेकर, काका मुंगसे, खंडू नजन, नवनाथ गोयकर, हरिभाऊ मुंगसे (देशमुख), कुटे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
