बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने निरंकारी अध्यात्मिक सत्संग सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे. बालाजी देडगाव येथील गोयकर वस्ती, गार माथा येथे उद्या मंगळवारी १८ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे परम शिष्य परम आदरणीय महात्मा बाळासाहेबजी शेटे यांच्या पावन उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोनई ब्रांचचे मुखी विठ्ठलजी खाडे महाराज, देडगाव येथील राजारामजी मुंगसे महाराज, गिरजू गोयकर, सदाशिव गोयकर तसेच समस्त साध संगत, देडगाव यांनी केले आहे. सत्संग समाप्तीनंतर भाविकांसाठी प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे.
