चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलचा शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कलासंचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत चाईल्ड करिअर  इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. या स्पर्धेत सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर परीक्षेत पलक श्रीकृष्ण कुऱ्हाडे, पूर्वा पद्माकर मते, तमन्ना समीर पठाण या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल  परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना कलाशिक्षिका निता परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य रवींद्र गावडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे.