श्री नागनाथ सार्वजनिक ग्रामीण वाचनालयात वाचन पंधरवाडा संपन्न

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील श्री नागनाथ सार्वजनिक ग्रामीण वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव पंधरवड्याचे आयोजन सुरू असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामभाऊ शेटे यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत वाचनालयात सामूहिक वाचन, वाचन संवाद, ग्रंथ प्रदर्शन आदी विविध पार पडले. या उपक्रमास वाचक मंडळीसह विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे वाचनालयाचे सचिव मनोहर अशोक शेटे यांनी सांगितले. युवकांमध्ये वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी, यासाठी वाचनालयातून विविध उपक्रम सतत सुरू असतात. तसेच या पंधरवड्यात गावातील ज्येष्ठ वाचक मंडळी काशिनाथ गटकळ, अरविंदराव घाडगे, शिवाजी घोडेचोर, लक्ष्मण कर्डिले, शिवनाथ घोडेचोर, आबासाहेब शेटे, भारत घोडेचोर, दीपक घाडगे, डॉ. कसब, शिवनाथ घाडगे, गुरुजी कारभारी काळे, लक्ष्मण काळे, गणेश शेटे तसेच विद्यार्थी वाचक प्रेमी सार्थक दुधाडे, प्रज्वल काळे, नैतिक घाडगे, साईदीप गोसावी, समर्थ गायकवाड, सुदर्शन गायकवाड, रोहित घोडेचोर, मयूर शेटे, सुप्रिया काळे, तनुजा शेटे, समृद्धी घोडेचोर तसेच सर्वस्व स्तरातील वाचक प्रेमींकडून उदंड प्रतिसाद मिळाला.