आविनाश हिवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आविनाश हिवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहांमध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आविनाश हिवाळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी पोलीस उपनिरीक्षक कानडे साहेब, माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युवा नेते निलेश कोकरे, भाजपचे आकाश चेडे, व्यावसायिक संघटनेचे किशोर मुंगसे, फकीरचंद हिवाळे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन योसेफ हिवाळे, सेवा संस्थेची माजी चेअरमन राजाराम मुंगसे, शिवाजी बनसोडे, पत्रकार युनूस पठाण, चंद्रभान हिवाळे, विश्वास हिवाळे, विकास हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांच्या वतीने आविनाश हिवाळे यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी आविनाश हिवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.