बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी बालाजी देडगाव येथील ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चित्रपटातील अनेक दृश्य बघून ग्रामस्थांना गहिवरून आले. अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पसायदानाने सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश चेडे, विवेक औटी, ज्ञानेश्वर केशव मुंगसे, विशाल मुंगसे, संकेत मुंगसे, श्रावण औटी, शुभम तांबे, सौरभ मुंगसे, अभय तांबे, अमोल म्हस्के, बंडाभाऊ टकले, विजय देवकाते, सोपानकाका मुंगसे, उद्धव नांगरे, रोहन म्हस्के, सिद्धार्थ रामानंद मुंगसे, किरण मुंगसे, शुभम दिक्षित यांनी विशेष परिश्रम घेतले.