बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील हैबती जेऊर येथील वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त हभप कृष्णा महाराज उगले यांच्या रसाळ वाणीतून किर्तनसेवा संपन्न झाली.जेऊर हैबती येथील ग्रामस्थांनी वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या समाजकार्याची दखल घेऊन सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, हभप कैलास महाराज रिंधे, हभप अनिल महाराज गरुड, हभप तुषार महाराज तागड , शिवाजी महाराज वाघ, सोपान महाराज रिंधे, रावसाहेब महाराज निकम, शिवाजी कपिले, बापूसाहेब वाघमारे, सुभाष महाराज औटी, संभाजीराव म्हस्के , अशोक ताकेडॉक्टर यांनी किर्तनसमयी उत्तम साथ दिली. याप्रसंगी वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते शंकरराव रिंधे यांनी दत्तोबा महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्यापासून सुरू होणाऱ्या अंखंड हरिनाम सप्ताहासाठी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करणारांसाठी सप्ताह कमिटीकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आले. तसेच दत्तोबा महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ वायुनंदन मंडप व परिवाराकडुन हनुमान जन्मोत्सव जेऊर हैबती सप्ताहासाठी पाच हजार एक्कावन रुपये सप्ताह कमिटीकडे सुपूर्द करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर अभियंता बाबासाहेब कारभारी म्हस्के साहेब, अण्णापाटील म्हस्के, जगन्नाथ शिंदे, दामोधर रिंधे, अमोल रिंधे (वायरमन), प्रदीप ताके सर, महेशराजे उगले, कैलासराव म्हस्के माजी चेअरमन, दत्ता टेलर तसेच जयसिंगराव धस, निवडुंगा येथील प्रगतिशील शेतकरी शरदराव कोलते पाटील, परशुराम कोलते, कल्याणराव ईथापे सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी सामाजिक कार्यकर्ते शंकरराव रिंधे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
