हनुमाननगर शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी उत्साहात 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील हनुमाननगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी उत्साहात  संपन्न झाल्या. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण काळे पाटील तर उपाध्यक्षपदी शंकर गायकवाड यांची निवड झाली आहे. इतर सदस्य म्हणून वैशाली बाळासाहेब सरोदे, मनीषा नागनाथ नवघरे, किसन कणगरे, सविता दत्तात्रय काळे, सुरेखा वारकड, सोनाली सुनील सरोदे, सोपान निवृत्ती गटकळ, सुरेश सरोदे, यशवंत सोलंकर, महेश गटकळ, बाबासाहेब काळे या सदस्यांची निवड करण्यात आली.
शिक्षक प्रतिनिधी म्हणून लांघे शि.भा., सचिव म्हणून श्री. लोंढे भा.नि., विद्यार्थी प्रतिनिधी शिवतेज गटकळ व विद्यार्थिनी प्रतिनिधी अंजली काळे यांची निवड झाली. समिती निवडीसाठी आयोजित पालक सभेत गावातील अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक सभेचे अध्यक्षपद रूपचंद गटकळ यांनी भूषवले. यावेळी मच्छिंद्र घोडेचोर, दीपक काळे, दीपक घाडगे, रेवन्नाथ गटकळ, सोपान गटकळ, ज्ञानदेव गटकळ, संदीप काळे, दत्तू काळे, संतोष शिंगटे, नागनाथ नवघरे, अशोक शिंगटे, राम शिंगटे, डायरेक्टर दत्तात्रय काळे, ज्ञानदेव काळे, अभिजीत काळे, सुनील सरोदे, राहुल सरोदे, किसन कणगरे, राहुल काळे, सोपान शेंडगे, रामचंद्र काळे, गोवर्धन काळे, किरण काते, प्रताप गटकळ, आमदार बाबुराव काळे, राजेंद्र गटकळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवड नियोजन मुख्याध्यापक लोंढे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन लांघे सर यांनी केले.