लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले पाटील व रवींद्र नवले यांची नियुक्ती

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक पदी शेवगाव  पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिज नरेंद्र घुले पाटील व रविंद्र काशिनाथ नवले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मंडळाची सभा शुक्रवार दि.१० जुलै रोजी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली.त्यात ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक  माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, संचालक पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ,डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे,  जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड,  काशिनाथ नवले, दत्तात्रय काळे, अशोक तानवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार ए.बी.खरड, एम.एस.मुरकुटे, एस.डी.चौधरी, महेंद्र पवार,प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के,मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, विलास लोखंडे, सुधाकर ढाकणे, हनुमंता शेंडगे, महेश भवर, दत्तात्रय चिमणे,कल्याण जांभूळकर आदी यावेळी उपस्थित होते.