बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव नवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, बुट व साॅक्स ग्रामस्थांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विद्यार्थी मित्रांचे गुलाबपुष्प देवून थाटामाटात स्वागत करण्यात आले.अशा स्वागतामुळे विद्यार्थी मित्रांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी केले. तर आभार श्रीमती मनिषा कांबळे मॅडम यांनी मानले. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
