मंथन सामान्यज्ञान परीक्षेत चाईल्ड करिअरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित गुणवत्ता संस्कार व संस्कृती म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंथन सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
मंथन परीक्षा ही राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून एकाच वेळी घेतली जाणारी अतिशय दर्जेदार अशी परीक्षा आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
विद्यार्थी आर्वी अजिंक्य विधाटे, अवनी राहुल पेहेरे, रेहान राजू शेख,शिवराज अनिल डांगे, अनिकेत विठ्ठल औताडे, पार्थ उद्धव काळे,चैतन्य राजेंद्र कुऱ्हाडे, वेदांत मोहन नजन,शितल आदिनाथ निकम,आरव राहुल पेहेरे, श्रुती अनिल साळुंके, पृथ्वीराज रविकांत शेळके, किमया कैलास तांबे, सोहम अजिंक्य विधाटे या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण मिळवले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक प्रा. सागर बनसोडे सर, प्राचार्य रवींद्र गावडे सर, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना रेणुका गोरे, छाया निकम, सुप्रिया लिंबे,उमा कुऱ्हाडे, शाहरुख सय्यद,संजय गरुटे, संतोष निकम, निलेश निधाने, कैलास तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.