बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना, नागरिकांनी, शारीरिक स्वास्थ्य संतुलित व समृद्ध राहील, आरोग्याची सुरक्षित काळजी घ्यावी, मन प्रसन्नता, अशा अनेक गोष्टींसाठी योगासने प्राणायाम करावी, हाच उद्देश योगदिनातून आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिवस निमित्त तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, गावातील सर्व मान्यवर मंडळी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत योगासने व प्राणायाम घेण्यात आले. योगदिनानिमित्त तेलकुडगाव येथील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी योगदिवस कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर, अनिल राजहंस सर यांनी योगासने व प्राणायामचे प्रशिक्षण देऊन योगाचे महत्त्व सांगितले. यावेळी तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच सतिशराव काळे पाटील, उपसरपंच शरद काळे, माजी सरपंच बालकनाथ काळे, संजय घाडगे आदी सदस्य, कृष्णा सरोदे क्लार्क, ग्रामस्थ, शिक्षक लोणारे सर, कडू सर, शेंडगे सर, लोंढे सर, उभेदळ सर, पांचग मॅडम, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
