बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र यात्रोत्सवाचे आयोजन

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र यात्रा उत्सवाचे उद्या शुक्रवार (ता.२६) आयोजन करण्यात आले आहे. बालाजी देडगाव येथील देडगाव-कुकाणा रोडवर असलेल्या राजा वीरभद्र देवस्थानमध्ये या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते होणार आहे. नवसाला पावणारे देवस्थान अशी ख्याती असलेल्या राजा वीरभद्र यात्रा उत्सवासाठी राज्यभरातून भाविक उपस्थित असतात. या यात्रा उत्सवादरम्यान येणाऱ्या भाविकांसाठी येथील पुजाऱ्यांच्या वतीने दिवसभर प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या यात्रा उत्सवामध्ये पारंपारिक गजढोल नृत्य व इतर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तरी या यात्रा उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बनसोडे, पंडित, नजन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.