जनशक्ती (वृत्तसेवा)- नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल येथे नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना मागील बाजूने जोरदार धडक दिली. या घटनेत सुमारे १० ते १५ जण जखमी झाले आहेत. आज सोमवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेनंतर काही अंतरावर जाऊन कंटेनर चालक वाहन सोडून पळून गेला. अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
