माका महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भानुदास चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र दिनानिमित्त सानिका सांगळे, प्रियांका भानगुडे व शितल खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले शंकरराव सांगळे यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये पीएच. डी. प्राप्त केलेले डॉ. प्रा.अमोल दहातोंडे व रसायनशास्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रा. शाहीदास काळे यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा सदुपयोग करून उज्वल भविष्य घडवावे, संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .अमोल दहातोंडे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.