बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. काशिनाथ राणाजी तांबे यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी तांबे वस्ती देडगाव येथे करण्याचे योजिले आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हभप मनोहर महाराज शिणारे यांचे १० ते १२ यांचे किर्तन होणार आहे.
तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मच्छिंद्र राणोजी तांबे (भाऊ), अंबादास काशिनाथ तांबे (मुलगा), सौ. वंदना बबन काळे (मुलगी), किशोर काशिनाथ तांबे (मुलगा), अर्चना सुजित शिरसाठ (मुलगी) तसेच समस्त तांबे परिवार यांनी केले आहे.
